All Credit : टीम अॅग्रोवन
कोरोना टाळेबंदीमध्ये विविध उपक्रमांसाठी आघाडीवर असलेल्या मंचर (ता.आंबेगाव) ग्रामपंचायतीने ग्रामस्थांच्या अत्यावश्यक सेवा आणि वस्तूंच्या पुरवठ्यासाठी ॲप विकसित केले आहे.
टीम अॅग्रोवन
Published on :
पुणे: कोरोना टाळेबंदीमध्ये विविध उपक्रमांसाठी आघाडीवर असलेल्या मंचर (ता.आंबेगाव) ग्रामपंचायतीने ग्रामस्थांच्या अत्यावश्यक सेवा आणि वस्तूंच्या पुरवठ्यासाठी ॲप विकसित केले आहे. www.digitalmancharcity.com या ॲपद्वारे शहरातील विविध व्यावसायिक, ग्राहक आणि शेतकरी जोडले गेले असून, ग्राहकांना ॲपवरील मागणीनुसार सेवा आणि वस्तूंचा पुरवठा कोणतेही सेवाशुल्क न घेता केला जात आहे.
Google Play Store App Link : https://play.google.com/store/apps/details?id=com.app.digitalmancharcitydmc&hl=en&gl=US
याबाबत मंचरचे सरपंच दत्ता गांजळे यांनी माहिती दिली. श्री. गांजळे म्हणाले, ‘‘कोरोना टाळेबंदी सुरु झाल्यापासून गावातील सर्वच अर्थव्यवस्था ठप्प झाली होती. ती सुरळीत करण्यासाठी तरुण संगणक अभियंता स्वप्निल भेके आणि तुषार वाबळे यांच्या संकल्पनेतून गावातील व्यावासायिक, ग्राहक, शेतकरी यांना एकत्र आणत ऑनलाइन बाजारपेठ सुरु केली. या ॲपमध्ये गावातील विविध व्यावसायिकांनी आपल्या व्यवसाय, दुकानाची माहिती ॲपवर सादर करणे आवश्यक आहे. व्यवसायाच्या वर्गवारीनुसार ग्राहक त्यांची मागणी ॲपवर नोंदविल्यानंतर संबंधित ग्राहकाला घरपोच मागणीची डिलिव्हरी मोफत केली जात आहे. शहरातील ६ हजार नागरिकांनी ॲप पाहिले असून, ८०० जणांनी डाऊनलोड केले आहे. त्यामुळे ग्राहकांना आता दुकानांत खरेदीसाठी गर्दी करण्याची गरज नाही.’’
मंचर ग्रामपंचायतीने विविध नावीन्यपूर्ण उपक्रमाद्वारे कोरोना संकटावर मात करण्याचा प्रयत्न केला आहे. यासाठी नागरिकांना शहरात वावरताना शारिरिक अंतर राखण्यासाठी छत्री पॅटर्न, ग्रामस्थांना जीवनावश्यक वस्तुंची घरपोच सेवा, वैद्यकीय सेवा, महामार्गावरून जाणाऱ्या कामगारांना जेवण, नाष्टा, रात्रीच्या वेळी रिफ्लेक्टर जाकीट वाटप आदी विविध उपक्रम राबविले आहेत. या उपक्रमांची दखल घेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सरपंच गांजळे यांचे दूरध्वनीच्या माध्यमातून अभिनंदन केले. ‘ई-ग्राम’ ॲप्लिकेशनचीही मदत मंचर ग्रामपंचायत ‘ॲग्रोवन’चे ‘ई-ग्राम’ ॲप्लिकेशनही वापरत आहे. या ॲपच्या माध्यमातून ग्रामपंचायतीला ग्रामस्थांचे आरोग्यविषयक सर्वेक्षण करण्यासाठी मदत झाली. तसेच ग्राहकांना सेवा आणि वस्तूंचा पुरवठा करण्यासाठी डिजिटल मंचर सिटी हे ॲप्लिकेशन वापरण्यासाठीही ग्रामपंचायतीला ‘ई-ग्राम’ या ॲप्लिकेशनचा उपयोग होत आहे. ई-कॉमर्ससाठी अशा प्रकारचे ॲप्लिकेशन वापरणारी मंचर ही राज्यातील पहिलीच ग्रामपंचायत आहे.
All Credit : टीम अॅग्रोवन